युवकाच्या हत्येचा उलगडा

गुन्ह्याची दिली कबुली, दोघांवर सुरत जिल्ह्यात गंभीर गुन्हे
युवकाच्या हत्येचा उलगडा

धुळे Dhule । प्रतिनिधी

शिंदखेडा Shindkheda तालुक्यातील दराणेतील Darane युवकाच्या निर्घुण हत्येचा brutal murder of a youth गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. घटनेनंतर काही तासातच एलसीबीच्या LCB पथकाने कसून शोध घेत खलाणेतील तिघांना शिताफिने अटक Arrested केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दराणेतील रहिवासी मयत प्रेमसिंग राजेंद्र गिरासे (वय 21) याने काल त्याच्या मित्रांसह पाटण येथे जावुन दुचाकीच्या शोरुमध्ये 24 हजार 900 रूपये डाऊनपेमेंट भरुन नवीन दुचाकी घेतली. तेथून दराणे गावाकडे येत असतांना सोनगीर-दोंडाईचा रोडवर चिमठाणे सब स्टेशनसमोर दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येवुन त्याला अडविले. त्याच्यावर धारदार हत्याराने वार करुन त्यांना जिवेठार मारुन त्याचे ताब्यातील नवीन दुचाकी व मोबाईल जबरीने हिसकावुन पळुन गेले.

एसपींच्या सुचना, पथके केली रवाना- घटनेबाबत पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांना समजताच त्यांनी धुळे जिल्ह्यातसह लगतच्या जिल्ह्यात घटनेबाबत माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन तपासाबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या. विविध तपास पथके तयार करुन ते आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले.

सीसीटीव्ही फुटेज, गोपनिय माहितीचा आधार- तपासादरम्यान प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय माहितीच्या आधारे हा गुन्हा हा खलाणेतील श्याम युवराज मोरे व त्याचे काही साथीदारांनी केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने खलाणे गावी जावुन श्याम मोरे याचा शोध घेतला असता तो त्याच्या पत्नीसह माळीच या गावी सासरवाडीला गेल्याची माहिती मिळाली.

पाठलाग करून दोघांना पकडले- पथकाने तत्काळ माळीच गावी जावुन खात्री केली असता श्याम युवराज मोरे व राकेश रोहिदास मोरे हे दोघे दुचाकीने (क्र.एम एच 18 ए एल 3691) शिरपुरचे दिशेने गेले आहेत, अशी माहिती समजली. त्यानुसार पथकाने तत्काळ मुंबई-आग्रा महामार्गाने शिरपुरचे दिशेने रवाना होवुन दुचाकीचा शोध सुरू केला. त्यादरम्यान एका दुचाकीवर दोन इसम शिरपुरचे दिशेने भरधाव वेगाने जात असल्याचे दिसल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना गव्हाणे शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे पुढे बाबा का ढाबा समोर रोडवर अडवुन ताब्यात घेतले.

तिघे अटकेत, गुन्ह्याची कबुली- श्याम युवराज मोरे (वय 28) व राकेश रोहिदास मोरे (वय 32) दोन्ही (रा.खलाणे ता. शिंदखेडा) अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली. हा गुन्हा त्यांचा साथीदार संदीप फुलचंद पवार (वय 21 रा.खलाणे) यांच्यासह केल्याची त्यांची कबुल दिली. त्यानंतर संदीप पवार यास खलाणेे गाव शिवारातून ताब्यात घेण्यात आले. त्यांना दुचाकीसह पुढील तपासकामी शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांना अटक करण्यात आली असुन त्यांची दि.11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दोघांवर गंभीर गुन्हे

वरील तिघांवर शिंदखेडा पोलिसात भादवि कलम 302, 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान गुन्ह्यातील श्याम मोरे व राकेश मोरे या दोघांविरुद्ध सुरत (गुजरात) जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राउत, बाळासाहेब सुर्यवंशी व त्यांचे पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com