उधना-पुणे एक्स्प्रेस रेल्वे दोंडाईचा मार्गाने सुरु

खा. भामरे, खा.गावीत व आ. रावल यांच्या प्रयत्नांना यश
उधना-पुणे एक्स्प्रेस रेल्वे दोंडाईचा मार्गाने सुरु

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

येथे पश्चिम रेल्वेच्या मार्गावर उधना, नंदुरबार, जळगाव, मनमाड, दौंडमार्गे पुणे एक्स्प्रेस दोंडाईचा मार्गाने सुरू झाली आहे.

यासाठी खा.डॉ. सुभाष भामरे,खा.डॉ. हिना गावीत व आ.जयकुमार रावल यांनी पाठपुरावा केला.अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन यांनी दिली.

सदर एक्स्प्रेस रेल्वे उधन्याहून प्रत्येक मंगळवारी दुपारी 12.15 वाजता पुण्यासाठी निघेल. तर दुपारी 3.45 वाजता दोंडाईचा येथे दाखल होऊन पहाटे 3.00 वाजता पुणे येथे पोहोचेल.

पुण्याहून परतीचा प्रवास बुधवारी पहाटे पाच वाजता पुण्याहून सुटेल तर दोंडाईचा येथे दुपारी 4.25 वाजता दाखल होऊन उधना येथे रात्री 9.00 वाजता पोहचेल.

सदर गाडी सुरत - अमरावती एक्स्प्रेसच्या रँकला लिंक राहणार आहे. दोंडाईचा व परिसरातील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची अनेक वर्षांपासून पुणेसाठी थेट एक्सप्रेसची मागणी होती.

ती आता पुर्ण होत असुन प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सदर गाडीच्या फेर्‍या वाढु शकतात. तरी प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन यांनी केले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com