वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
अपघात | Accident

बोराडी - Dhule- वार्ताहर :

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील घाटी परिसरात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे सख्ये भाऊ जबर जखमी झाले. त्यात अनिल दुर्गा पावरा (वय 23 रा.सांगवी ता.शिरपूर) याचा मृत्यू झाला.

ही घटना दि.26 जुलै रोजी पाच वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर दोघा भावांना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते.

येथे उपचारादरम्यान दि. 27 रोजी सकाळी अनिल पावरा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कनिलाल हिरमल पावरा यांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com