वीज पडून दोन जण ठार, दोघे जखमी

कुरखळी गावालगतची घटना
वीज पडून दोन जण ठार, दोघे जखमी

शिरपूर । प्रतिनिधी Shirpur

आज दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसात तालुक्यातील कुरखळी गावालगत शेतात विज पडून दोन जण, दोन गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

दोन आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आज दुपारी जोरदार पुनरागमन झाले. ढगांचा गडगडाट आणि प्रचंड विजांसह पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या पावसाने शेतकरी काहीसे सुखावले असले तरी त्याने मनुष्यहानी ही केली आहे. वीज पडून दोघांचा बळी घेतला असून मनोज सुकलाल कोळी (वय 25) सुनील सुदाम भिल (वय 30 ) दोन्ही रा. कुरखळी अशी मृतांची नावे आहेत. तर समाधान बरकू भिल (वय 30 ) रवींद्र गुलाब भिल (वय 32) हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कुरखळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com