<p><strong>धुळे | प्रतिनिधी Dhule</strong></p><p>शहरातील कुमार नगरात दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आज पहाटे उघडकीस आला. त्यात ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.</p>.<p>साक्री रोडवरील कुमार नगरात दुर्गेश काबडा हे राहतात. त्यांनी काल दि. ८ रोजी रात्री नेहमीप्रमाणे घराबाहेर आपल्या दोन दुचाकी (क्र. एमएच १८ एबी २७४७ व क्र. एमएच १८ एएल ४५९०) लावल्या होत्या. आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास घराबाहेर कशातरी स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाला. त्यामुळे काबडा यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. त्यांनी दोन्ही दुचाकींची आग विझविली. आगीत दोन्ही दुचाकी जळून सुमारे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>