धुळे । प्रतिनिधी Dhule

वाहनात विनापरवाना जनावरांना कोंबून वाहतूक करतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चितोड गावानजीक पकडून आठ जनावरांची सुटका केली. या ठिकाणाहून वाहनासह जनावरे असा तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन चितोड गावानजीक एमएच 18 एए 0513 क्रमांकाचे वाहन पकडले. या वाहनात सहा गायी, दोन गोरे असे आठ जनावरे निर्दयतेने बांधून त्यांची वाहतूक केली जात होती. या ठिकाणाहून जनावरे व वाहन असा तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी गोलू उर्फ सचिन दत्तू माळवे (वय18) रा. लोंढानाला वाहनचालक, मोहम्मद ताह मोहम्मद नासीर अन्सारी, कालू महारु मालुसरे या तिघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सचिन माळवे, मोहम्मद ताह यांना अटक केली. तर कालू मालुसरे हा फरार आहे.

सदर कारवाई पोहेकॉ रफीक रशीद पठाण, संदीप थोरात, गौतम सपकाळे, पोकॉ श्रीशैल जाधव, संजय सुरशे, विलास पाटील, दीपक पाटील यांच्या पथकाने केली.