रक्षाबंधन निमित्त लाखोंची उलाढाल

रक्षाबंधन निमित्त लाखोंची उलाढाल

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात रक्षाबंधन उत्साहात Rakshabandhan in excitement साजरी करण्यात आली. रक्षाबंधनानिमित्त लाखोंची उलाढाल Rakshabandhan Turnover of lakhs झाली आहे. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थेतर्फे देखील रक्षाबंधन साजरी करण्यात आली. पोलिसांना police राखी बांधून संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्यात रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्यात आली. रक्षाबंधनानिमित्त शहरात विविध ठिकाणी राखींचे दुकाने थाटण्यात आली होती. आजही राखी खरेदीसाठी गर्दी झाली होती. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेट वस्तू देतो. त्यामुळे कापड बाजार, सराफ बाजार, इलेट्रॉनिक दुकानात खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

रक्षाबंधनानिमित्त मिठाईंच्या दुकानांवरही गर्दी झालेली दिसून आली. मिठाईंचे दुकाने सजविण्यात आली होती.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सतत कार्यान्वित असतात अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना आपले सणवार उत्साहात आणि आनंदात शांततेत साजरे करता येतात. परंतू पोलिसांना सण साजरा करता येत नाही. त्यामुळे धुळे जिल्हा युवती सेनेतर्फे धुळे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह पोलीस अधिकारी, ट्राफिक पोलिस, कर्मचार्‍यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

याप्रसंगी युवतीसेना जिल्हा युवती अधिकारी सोनी सोनार, शहर युवती अधिकारीं दक्षता पाटील, नेहा वाघ, उपशहर अधिकारी चिन्मयी सूर्यवंशी, चेतना अहिरराव, ग्रामीण अधिकारी गायत्री सदनोर व युवती पदाधिकारी उपस्थित होत्या.

साक्री तालुक्यात तालुका युवती अधिकारी कामिनी देसले यांच्यासह युवती पदाधिकार्‍यांनी साक्रीतील पोलीस, डॉक्टर, कर्मचारी यांना राखी बांधून रक्षबंधन कार्यक्रम साजरा केला.

शिंदखेडा तालुक्यात देखील जिल्हा युवती अधिकारी शिवानी पवार, शहरप्रमुख रविना परदेशी, रुबिना पिंजारी यांच्यासह सर्व युवती पदाधिकारींनी डॉक्टर, पोलिस, कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली दिसून आली. तसेच लक्झरी बसेसवरही गर्दी झालेली होती. त्यामुळे त्या संधीचा फायदा घेत लक्झरी बसेसचे तिकीट दर दुप्पटीने वाढविण्यात आले होते. तरी देखील अनेकांनी लक्झरी बसने जाण्यावर पसंती दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com