जिल्ह्यातील 9 पोलिस अधिकार्‍यांची खांदेपालट

चौघांच्या पोलिस निरीक्षकांच्या विभागाबाहेर बदल्या
जिल्ह्यातील 9 पोलिस अधिकार्‍यांची खांदेपालट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा नऊ अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहे.

तसे आदेश पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी काढले आहेत.

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या नऊ अधिकार्‍यांच्या जिल्हातंर्गत बदल्या झाल्या आहेत. विनंती व प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी काढले आहेत.

त्यात धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांची धुळे तालुका पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. साक्रीचे निरीक्षक नितीन देशमुख यांची धुळे शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

आझादनगर निरीक्षक दिनेश आहेर यांची साक्री पोलिस ठाणे, नियंत्रण कक्षातील आनंद कोकरे यांची आझादनगर पोलिस ठाणे, नियंत्रण कक्षातील निरीक्षक युवराज गायकवाड यांची धुळे शहर वाहतूक शाखेत विनंती बदली करण्यात आली आहे.

तसेच शिंदखेडा पोलिस निरीक्षक दुर्देश तिवारी यांची देवपूर पोलिस ठाणे, सपोनि योगेश राजगुरू मोहाडी पोलिस ठाणे, सपोनि चंद्रकांत पाटील यांची शिंदखेडा, तर सपोनि मनोज ठाकरे यांची नरडाणा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

चौघांच्या विभागाबाहेर बदल्या

जिल्हा पोलीस दलातील चौघा निरीक्षकांच्या नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बदली केली आहे. तर नाशिक ग्रामीणमधून दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

जिल्हा विशेष शाखेचे (डीएसबी) पोलीस निरिक्षक देविदास ढुमणे व मानव संसाधन विभागाचे निरिक्षक व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे.

तर देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील निरीक्षक प्रकाश मुंढे यांचीही नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. तर जिल्हात दोन नवीन अधिकारी येणार आहेत. त्यात नाशिक ग्रामीण येथे कार्यरत असलेले अनंत रंगनाथ तारगे व बशिर अहमद करिम शेख यांचा समावेश आहे.

दरम्यान धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची औरंगाबाद शहर व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांची ठाणे येथे यापुर्वीच बदली झालेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com