अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने आज सायंकाळी कारवाई केली. ट्रॅक्टर दंडात्मक कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आले.

मांजरोद शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले.

चालकाची चौकशी केली असता वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कार्यवाही उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले.

ही कारवाई तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व्ही.के.बागुल, थाळनेर तलाठी मराठे, तलाठी संदीप महाजन, नागलोद, वाहन चालक सतीश पाटोळे यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com