अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

तापी नदी पात्रात अप्पर तहसीलदारांची कारवाई,अडीच लाखांचा दंड वसूल

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरासह परिसरात अवैध वाळु उपसा करणार्‍यांनी हैदोस घातला आहे. आज पहाटेच्या सुमारास टाकरखेडा शिवारात तापी नदी पात्रात अप्पर तहसीलदारांनी छापा टाकत तीन ट्रक्टरला पकडले.

विशेष म्हणजे त्यांनी स्वतः ट्रॅक्टरवर दोंडाईचा पोलीस ठाण्यात जमा केले. दोन ट्रॅक्टर मालकाकडून 2 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर तिसरे ट्रॅक्टरवर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अपर तहसीलदार सुदाम महाजन हे दुचाकीने थेट भादवड, बह्याणे, ता. नंदुरबार मार्गाने टाकरखेडा (ता.शिंदखेडा) शिवारातील तापी नदी पात्रात पोहाचले. तेव्हा दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात होती. तर एक ट्रॅक्टर उभे होते.

त्यावरील चालकांना विचारपुस केली असता ट्रॅक्टरवरील (क्र. एम. एच 18 ए एन 1892) चालक अरविंद विठ्ठलसिंग गिरासे, मालक संग्राम कोमलसिंग गिरासे, एम. एण 18 ए एन 0931 क्रमाकाचा चालक व मालक भूषण प्रकाशसिंग गिरासे, विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरचा चालक भिका जगन कोळी, मालक विनोद दिनेश ठाकरे सर्व (रा. टाकरखेडा) अशी त्यांनी नावे सांगितले. यांच्याकडे वाळू वाहतूकीचे परवाने मिळून आले नाहीत. म्हणून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन स्वतः नदी पात्रातून ट्रॅक्टरवर बसून दोंडाईचा पोलीस ठाण्यात तीनही ट्रॅक्टर जमा केले.

ही कारवाई अपर तहसिलदार सुदाम महाजन, तलाठी डी. ए. भगत, तलाठी एस.एस. कोकणी, तलाठी एन.एस. माजलकर, चालक युवराज माळी आदींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com