लळींग धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

अन्य तिघे जखमी, सर्व अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी
लळींग धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
लळींग धबधबा ,धुळे

धुळे - शहरापासून जवळच असलेल्या लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस. एस. व्ही. पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली.

मरण पावलेल्या तीन पैकी दोन जण धुळे शहरातील तर अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर तीन जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com