चोरीच्या तीन मोटार सायकली जप्त, दोघांना अटक

धुळे शहर पोलीसांची कारवाई
चोरीच्या तीन मोटार सायकली जप्त, दोघांना अटक

धुळे | प्रतिनिधी Dhule

शहर पोलीसाच्या पथकाने तीन चोरीच्या मोटार सायकली जप्त केल्या. तर दोन जणांना अटक केली. तर एक संशयित फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढले. याला आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत (Superintendent of Police Chinmay Pandit), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.

दि.७ जुलै २०२१ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात वर्ग ०५ गुरनं.१४६/२०२१ भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील लाल रंगाची मोटार सायकल (क्र. एम.एच.१८ ए.एम ६०११) ही अरिहंत ज्वेलर्स समोरुन चोरीस गेली होती. पो.नि नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील

कर्मचार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने मालेगाव जाफरनगर येथील मो.शोएब ऊर्फ पापे फैयाज अहमद रा.प्लॉट नं.९३ जाफरनगर मोहम्मद अली रोड मालेगाव व अब्दुल सालीक अब्दुल रहेमान मोमीन रा.घर नं.१४४.स. नं.९३.जाफरनगर मालेगाव, अमजदअली जेनुलाबद्दीन अन्सारी रा.जाफरनगर,मालेगाव या आरोपींचा शोध घेतला.

मो.शोएब ऊर्फ पापे फैयाज अहमद व अब्दुल सालीक अब्दुल रहेमान मोमीन यांच्या कडून ६५ हजार रुपये किंमतीच्या तीन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन बी.देशमुख, सपोनि दादासाहेब पाटील, सहा.पो.उप.निरी. एनएस आवाटे. पोहेकॉभिकाजी पाटील, पोना संदीप पाटील, प्रल्हाद वाघ,पोकॉ प्रसाद वाघ, प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, अविनाश कराड, शेखर वाडेकर, शाकीर शेख, चालक नितीन अहिरे,सचिन पगारे यांच्या पथकाने केली. मो.शोएब ऊर्फ पापे फैयाज अहमद, अब्दुल सालीक अब्दुल रहेमान मोमीन या दोघांना पथकाने अटक केली तर अमजदअली जेनुलाबद्दीन अन्सारी हा संशयित फरार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com