prison संग्रहित छायाचित्र
prison संग्रहित छायाचित्र
धुळे

दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघांचे कारागृहातून पलायन

Balvant Gaikwad

धुळे- शहरातील जिजामाता कन्या विद्यालय, मुलींच्या वस्तीगृहात केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून आज दुपारी दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन संशयितांनी पलायन केले. तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान एकाला पोलिसांनी पकडले आहे. या बाबत तुरुंगाधिकारी निवृत्ती कंनेन्नवाड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आज दुपारी पावणेतीन ते तीन वाजे दरम्यान जिजामाता

कन्या विद्यालय, मुलींचे वस्तीगृह येथील तात्पुरते कारागृहात दाखल असलेले दरोड्याच्या गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी राहुल अजय उज्जैनवाल (रा. फोडींस बाडी, जय भवानी रोड नाशिक रोड),नाशिक, सन्तु भैरु राजपूत (रा. बड़ी साबड़ी जि. चित्तोडगड ह मु रोकडोबा वाडी, जयभवानी रोड, नाशिक), विजय उर्फ झिंग्या सरजीत बॅडवाल (रा.फर्नाडींसवाडी, जयभवानी रोड, नाशिक रोड, नाशिक) या तिघांनी शौचालयातील करांडयाकडील ग्रिलचे गज तोडून भिंतीस असलेल्या पाईपच्या साहय्याने टेरेसवर चढुन पळून गेले.

हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याची शोधाशोध सुरू केली. परंतु ते कुठे मिळून आले नाही. तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी एकाला लळिंग शिवारातून पकडले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com