अटक करण्यात आलेले आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी
अटक करण्यात आलेले आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सोबत पोलीस अधिकारी व कर्मचारी

धुळ्यात तिघे ताब्यात, दोन गावठी कट्टे हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीसांची कामगिरी

धुळे - Dhule

शहरातील साक्री रोड परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळा पथकाने दोघांना तर कुंडाणेतून एकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्यासह तीन जिवंत काडतूस असा एकुण 71 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

शहरातील साक्री रोडवरील भिमनगर समोर रस्त्यावर दीपक सुरेश शिरसाठ (रा. साक्री रोड, धुळे) हा एक गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंता यांनी आज मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुपारी सापळा लावून दिपक शिरसाठ याला भिमनगर येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 35 हजार 500 रूपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा व एक काडतूस मिळून आली.

चौकशीत त्याने कट्टा व काडतूस हे पंकज परशराम जिसेजा (रा. पद्मनाभनगर, साक्री रोड, धुळे) याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार पंकज जिसेजा याचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेण्यात आले. विचारपूस करता त्याने कबुली देऊन आणखीन एक गावठी कट्टा अभय दिलीप अमृतसागर (वय 30 रा. कुंडाणे ता.धुळे) यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने कुंडाणे गावात जाऊन अभय अमृतसागर याला देखील ताब्यात घेतले. त्याच्याकडे 36 हजारांचा एक गावठी कट्टा व दोन काडतूस मिळून आले. दोघांकडून असे एकूण 71 हजार 500 रूपये किंमचे 2 गावठी बनावटीचे कट्टे व 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यायन पंकज जिसेजा याच्याविरूद्ध शहर व धुळे तालुका पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अभय अमृतसागर यांच्याविरूद्ध ही धुळे तालुका गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तिघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ. श्रीकांत पाटील, संजय पाटील, पोना प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे, गुलाब पाटील यांनी केली आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com