धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेचे स्थायी सभापती सुनिल बैसाणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जीवेठार मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र मिळाले आहे.

असा गौप्यस्फोट स्वत: सभापती बैसाणे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. परंतू यामागे कोणी अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्षाचे कोणी असेल याची गय केली जाणार नाही. याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे बैसाणे यांनी यावेळी सांगितले.

स्थायी समितीची बैठक आज सभापती बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, अमोल मासुळे, भारती माळी, संतोष खताळ, युवराज पाटील, सुनिल सोनार, विमलबाई पाटील, सुरेखा देवरे, पुष्पाताई बोरसे, कमलेश देवरे आदी उपस्थित होते.

सभतेच्या सुरवातीलाच बैसाणे यांनी माझ्यासह कुटुंबियांना जीवे ठार मारण्याबाबत निनावी पत्र मला आहे. असे त्यांनी सांगितले. मी सभापती म्हणून काम करतांना जनतेच्या प्रश्नांवर भर दिला.

परंतू मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापुर्वीही मला एक निनावी पत्र आले होते. परंतू त्याकडे मी दुर्लक्ष केले. परंतू आता दुर्लक्ष करुन चालणार नाही मला मानसिक त्रास होत आहे. माझ्याबद्दल कोणाची तक्रार असेल तर समोर यावे, मी त्यांचे स्वागत करेल, परंतू मला कुणी टार्गेट केले तर मी त्यांची गय करणार नाही.

पत्र पाठविण्यामागे कोणी अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्षातील कोणी असेल तर त्याची गय केली जाणार नाही. याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडून यात दुजाभाव होणार नाही, कायम सहकार्य राहिल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आता रिलायबलकडे कचरा संकलन

घनकचरा संकलन करणार्या वॉटरग्रेस कंपनीने अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा संकलासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने कचरा संकलनाचा तात्पुरता ठेका नागपूर येथील रिलायबल एजन्सीला दिला आहे. अशी माहिती स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. रिलायबलने देखील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहणार असून नागरिकांच्या सोयीसाठी धुळे शहर व देवपूर अशा दोन ठिकाणी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्याचे आदेशही सभापती बैसाणे यांनी दिले.