कृषी केंद्रातून रोकडसह फवारणीची औषधे लंपास
धुळे

कृषी केंद्रातून रोकडसह फवारणीची औषधे लंपास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरालगत असलेल्या मोराणे येथील कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी फोडून रोकडसह फवारणीची औषधे लंपास केले आहेत. याबाबत उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरालगत असलेल्या मोराणे गावातील डी.आर नगरात इंदू कौतिक कॉम्प्लेक्समध्ये सुदर्शन भारत सोनवणे यांचे श्रीराम समर्थ कृषी सेवा केंद्र नावाचे आहे.

चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील गल्यातील सुमारे 23 हजार 340 रुपये व 70 ते 75 हजार रुपयांची शेती फवारणीची औषधे चोरांनी लंपास केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com