धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील मुख्य बाजारपेठेतील आग्रा रोडवरील बडगुजर अॅण्ड सन्स या सायकलच्या शोरुममध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. थेट तिसर्या मजल्यावरील लिफ्टचा पत्रा कापून आत प्रवेश करून गल्ल्यातील सुमारे दोन हजारांची रोकड लंपास केली. घटनेमुळे व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील आग्रा रोडवर फुलवाला चौकाजवळ बडगुजर अॅण्ड सन्स हे सायकलचे शोरुम आहे. शोरुमच्या तिसर्या मजल्यावरील लिफ्टच्या ड्रन्टचा पत्रा कापून चोरट्याने पाईपच्या सहाय्याने दुसर्या मजल्यावर प्रवेश केला.

दुसर्या मजल्यावर ड्रन्टचे प्लाऊड कापून तो खाली उतरला. चोरट्याने गल्लयातील 1500 ते 2 हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरून नेला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात देखील अशाच प्रकारे या शोरुमध्ये चोरी झाली होती.

त्यावेळी चार ते पाच हजाराची रोकड चोरीस गेली होती. दुकाना शेजारीच अरुण कबाडे यांच्या दुकानाचे काम सुरु आहे. तेथूनच चोरटे बडगुजरमध्ये शिरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ड्रन्टमध्ये सेंट्रींग कारागिराचे कपडे आढळून आले आहे. पोलिसांनी ते जप्त केले आहे. याबाबत आझादनगर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.