तापी पुलावरुन वाहन कोसळले

नदीपात्रात शोध कार्य सुरू
तापी पुलावरुन वाहन कोसळले

कुरखळी, ता.शिरपूर Shirpur - वार्ताहर

शिरपुर तालुक्यातील सावळदे गावालगत असलेल्या तापी पुलावरुन नरङाणा कङुन शिरपुरकङे येणारे वाहन पाण्यात पङल्याची घटना आज उघङकीस आली, शोध कार्य सुरू असून ते वाहन...

सदर वाहन हे लक्झरी असल्याचा सशंय पोलिसाकङुन व्यक्त केला जात आहे. पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान ही घटना झाली असावी. नरडाणा पोलीस, महामार्ग पोलिस सुरक्षा पथकचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असुन चौकशी करीत आहेत.

या वाहनाचा टायर फुटला असावा किंवा चालकाला डुलकी आली असावी यामुळे सदर घटना घङली असावी, असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी वाहने हे डाव्या बाजुचा कठङा तोडून पङल्याची घटना घङाल्या आहेत. मात्र हे वाहन उजव्या बाजुचा कठङा तोङुन पङले आहे.

सदर वाहन हे लक्झरी की ट्रक याबाबत काही वेळात माहिती उपलब्ध होऊ शकेल, स्थानिक मासेमारी करणाऱ्या गोताखोरांच्या मदतीने वाहन व सध्य परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com