ट्रक व आयशरची समोरासमोर धडक
धुळे

ट्रक व आयशरची समोरासमोर धडक

एक ठार, एक जखमी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

विखरण रोडवर मालवाहतूक करणारी आयशर गाडी व ट्रक यांचा समोरासमोर अपघात झाल्याने प्लायवुड वाहतूक करणार्‍या आयशर गाडीतील चालक जागीच ठार झाला आहे. तर ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातून धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

आज दि. 7 रोजी दोंडाईचा विखरण रस्त्यावर धुळ्याकडून सुरतकडे जाणारी आयशर गाडी व दोंडाईचाकडून धुळ्याकडे जाणार्‍या मालवाहू ट्रक यांच्यात हा अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने समोरून येणार्‍या आयशर गाडीवर तो आदळला.

या अपघात आयशर गाडीचा चालक ठार झाला असून त्याचे नाव जितेंद्रभाई वाघेला (बिहार) असल्याचे सांगितले जाते.तर ट्रक मधील सुनील टेनपल्ली आंध्रप्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे वाहतूकीची कोंडी झाली.

दोंडाईचा पोलीस स्टेशनचे निरिक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू साळुंखे व मोरे यांनी घटनास्थळी जावून रहदारी सुरळीत केली. अपघाताची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com