धुळे - प्रतिनिधी Dhule

महाविद्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतरचा पेंशन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी व प्रस्तावावर सहया करण्याच्या मोबदल्यात 3 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या प्राचार्याला एसीबीच्या पथकाने रगेहाथ पकडले.

गुलाब नथ्थु पिंजारी, वय 55 (न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय, पिंजारझाडी ता.साकी) असे त्या प्राचार्याचे नाव आहे. ही

सापळा कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षण प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण व त्यांच्या पथकातील पोहेकॉ जयंत साळवे, पोना संतोष हिरे, संदीप सरग,

राजन कदम, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, पोकॉ प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदीप कदम, भुषण शेटे, सुधीर मोरे यांनी केली आहे.