गावठी कट्टयासह काढलेला फोटो पडला महागात, तरूण ताब्यात

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई
गावठी कट्टयासह काढलेला फोटो पडला महागात, तरूण ताब्यात

धुळे | प्रतिनिधी |Dhule

शहरात बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरू केली आहे. त्यात एकाला गावठी कट्टयासह काढलेला फोटो चांगलाच पडला महागात पडला आहे. चाळीसगांव रोड पोलिसांनी शोध घेवून त्याला जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

मोबीन शेख गुलाम गौस (रा. कबीरगंज, रहेमत मस्जीद जवळ, धुळे) यांच्या हातात लोखंडी गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) असेलेला फोटो मोबाईलमध्ये प्राप्त झालेला असुन त्याचे जवळ गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती काल सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन तो राहत असलेल्या घरात छापा टाकला. तेव्हा घरात एक इसम मिळुन आला. त्याने मोबीन शेख गुलाम गौस असे त्याचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला त्याच्या हातात गावठी कट्टा असलेला मोबाईलमधील फोटो दाखवुन गावठी कट्टयाबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली.

खाक्या दाखविताच त्याचे घरामधील लोखंडी पेटीत ठेवलेली गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) काढुन दिला. त्यांच्याविरुध्द पोकॉं स्वप्नील सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव रोड पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ए.आय.शाह हे करीत आहेत.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, उपनिरीक्षक योगेश ढिकले, विजय चौरे, हेड कॉन्टेबल अजीज शेख, पोलिस नाईक भुरा पाटील, पोलिस कॉन्टेबल मुक्तार शाह, हेमंत पवार, संदिप वाघ, स्वप्निल सोनवणे, सोमनाथ चौरे यांनी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com