डेंग्यूवर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने सहकार्य करावे

महापौर प्रदीप कर्पे यांचे आवाहन, माहिती संकलीत करून उपाययोजनांवर भर
डेंग्यूवर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने सहकार्य करावे

धुळे Dhule। प्रतिनिधी

डेंग्यूच्या (dengue) भितीमुळे नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण होते. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी (Medical officers) व रूग्णालयामार्फत (hospitals) रूग्ण व नातेवाईकांचे या आजाराबाबत समुपदेशन (Counseling) करावे. डेंग्युचा प्रसार (spread of dengue) रोखण्यासाठी महापालिकेस (Municipal Corporation)सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी केले.

शहरातील साथीचे रोग व डेंग्य सदृश्य परिस्थितीची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रूग्णालयाचे प्रतिनिधी व वैद्यकीय संघटनाचे प्रमुख यांची एकत्रित बैठक आज महापौर कर्पे यांच्या उपस्थितीत आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनात झाली. यावेळी ते बोलत होते.

महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख रूग्णालय तसेच रक्तपेढी यांचा एकत्रित व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून यात महापालिकेने निश्चित केलेल्या प्रपत्रात रूग्णालयात दाखल असलेल्या संशयीत तसेच डेंग्यू रूग्णांची दैंनदिन माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच यासाठी कर्मचारी नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत या सर्व रुग्णालयांना भेटी देवून माहिती गोळा करण्यात येते.

संकलित झालेल्या माहितीच्या आधारे संशयीत व डेंगयूच्या रुग्णांच्या निवासस्थानी तसेच परिसरात अँबेटींग, फवारणी, धुरळणी करणे रुग्णांचे व नातेवाईकांचे रक्त गोळा करून तपासणीसाठी पाठविणे, अशी कार्यवाही तातडीने महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. ही कार्यवाही योग्य व तत्काळ व्हावी, यासाठी संबंधित रूग्णालयांनी तातडीने अचुक माहिती सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच शासनाने निश्चित केलेल्या रक्त तपासणी अहवालानंतरच डेंग्यूचे निदान करण्यात यावे व नागरीकांमध्ये सकारात्मक व विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

शहरातील डेंग्यू व साथीच्या रोगावर मात करण्यासाठी सर्व वैद्यकीय यंत्रणेने सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त देवीदास टेकाळे यांनी केले. बैठकीचे प्रस्ताविक आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे यांनी केले.

बैठकीला अति.आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, महिला व बालकल्याण सभापती सौ.वंदना थोरात, नगरसेवक हिरामण गवळी, सहा.आयुक्त पल्लवी शिरसाठ, नारायण सोनार, सहा.आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, श्री छत्रपती हॉस्पिटलचे डॉ.महेंद्र गिरासे, श्रध्दा हॉस्पिटलचे वंदना सागवेकर, गणेश चौधरी, सेवा हॉस्पिटलचे युवराज पवार, सिध्देश्वर हॉस्पिटलचे भटेसिंग सोलंकी, केशरानंद हॉस्पिटलचे वाल्मिक बोरसे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे नितीन लिगांयत, गणेश पाटील, डॉ.मयुर तसेच डॉ.अभिनय दरवडे, महेश अहिरराव, डॉ.जयंत देवरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com