खुनातील संशयित आरोपीचे घर जाळले
धुळे

खुनातील संशयित आरोपीचे घर जाळले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule :

शहरातील मोहाडी उपनगरातील तरूणाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीचे जमावाने घर जाळल्याची घटना आज भर दुपारी घडली. घटनेमुळे कुटुंबिय भयमित झाले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोहाडी उपनगरातील राहुल काशिनाथ मिंड/मराठे (वय 38) या तरूणाची दि. 19 जुलै रोजी लळींग टोल नाक्याजवळील महाकाल हॉटेल परिसरात पुर्ववैमस्यातून भरदिवसा हत्या करण्यात आली. याप्रकरणी मोहाडी पोलिसात आकाश कोळी, चॅम्पियनसिंग किस्मतसिंग भादा याच्यासह 24 जणांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान गुन्ह्यातील संशयीत चॅम्पियनसिंग भादा यांच्या घरावर आज दि. 27 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जमाव चालुन आला. त्यांनी थेट घरा पेटवून दिले. त्यात घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. त्यामुळे घटनेमुळे कुटुंबिय भयभित झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता राऊत यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील आग विझविण्यास मदत केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com