बंदिवानांसाठीच्या जेवणाचा पालकमंत्र्यांनी घेतला स्वाद

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा कारागृहात अद्ययावत स्वयंपाक गृहाचा शुभारंभ
बंदिवानांसाठीच्या जेवणाचा पालकमंत्र्यांनी घेतला स्वाद

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे जिल्हा कारागृहाला District Jail ऐतिहासिक वारसा Historical heritage लाभला आहे. या तुरुंगात स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, जमनललाल बजाज, सानेगुरुजी Acharya Vinoba Bhave, Karmaveer Dadasaheb Gaikwad, Jamanlal Bajaj, Saneguruji यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यांचा आदर्श घेत बंदिवानांनी तुरुंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार Guardian Minister Abdul Sattar यांनी येथे केले.

जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर अनुदानातून धुळे जिल्हा कारागृहात बंदिवानांसाठी स्वयंपाकगृहात सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्राप्त यंत्रसामग्रीचे उदघाटन पालकमंत्री श्री.सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी बलिदान, त्याग केला. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांपैकी काही जणांना याच कारागृहात बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते. बंदिवानांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. कारागृहातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बंदिवानांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी. बंदिवानांच्या तक्रारी विहित कालावधीत सोडविण्यात याव्यात. तसेच बंदिवानांनी गुन्हेगारीमुक्त होवू, या असा निर्धार करावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले.

कारागृह अधीक्षक श्री.गायकवाड यांनी सांगितले, की धुळे जिल्हा कारागृहाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच कारागृहात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या बंदिवानांना ठेवण्यात आले होते. कारागृहातील बंदिवानांसाठी अद्ययावत स्वयंपाक गृह कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वीच कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी पारिजात चव्हाण, गायत्री चव्हाण यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. तुरुंगाधिकारी श्रीकृष्ण भुसारे, नेहा गुजराथी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतली भोजनाची चव

पालकमंत्री श्री. सत्तार यांनी तुरुंगातील विविध कक्षांना भेटी दिल्या. आचार्य विनोबा भावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, सानेगुरुजी यांना या बराकींनमध्ये ठेवण्यात आले होते. त्या आरक्षित असून याठिकाणी त्यांनी अभिवादन केले. तसेच स्वयंपाक गृहाला भेट देवून बंदिवानांसाठी बनविलेल्या जेवणाची चव घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com