चिमठाणे । वार्ताहर

शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील शेतकर्यांने पपई या पिकाला भाव मिळत नसल्याने तसेच शेतामधून माल बाहेर काढण्यासाठी रस्ता नसल्याने नाराजी व्यक्त करत थेट पपई पिकावरच रोटावेटर फिरविला. हाताशी आलेले संपुर्ण एक एकरावरील पपई पिक नष्ट केले.

शेतकरी शालिग्राम झिंगा पाटील (रा.आमराळे) यांनी एक एकर या आपल्या बागायत क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली होती. यासाठी वेळोवेळी निगा राखत पाच ते सात लाख रुपये खर्च केले होते. पपई वाढही पुर्ण झालेले होती. परंतू येवढ खर्च करून, मेहनत घेवूनही पपईला चांगला भाव मिळाला नाही.

तर दुसरीकडे व्यापारी देखील शेतीच्या बांधावरून येऊन परत फिरून जात होते. कारण शेतातून माल नेण्यासाठी रस्ता देखील नाही. म्हणून शेवटी पाटील यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पपई पिकावर रोटावेटर फिरवून पिक उध्वस्त केले. त्यात त्यांचे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केलेला खर्च व मेहनत देखील वाया गेली. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

शेतकरी शालीग्राम पाटील यांच्या शेतापासून माल बाहेर विक्री करण्यासाठी रस्ता देखील नसल्याने व्यापारी येऊ शकत नाही. यामुळे शेतकर्याला नुकसानीला सामोरे जावे लागले. दरम्यान निसर्गगाचा लहरीपणा, कमी जास्त पाऊस, भाव न मिळणे अशा एकना अनेक संकटाना शेतकर्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे कर्जबाजारी होत शेतकरी आपले जीवन देखील संपवल्याच्या घटना यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांर्भीयाने बघण्याची गरज आहे.

आता तरी प्रशासनाने दखल घ्यावी

यंदा एक एकर शेतात पपई पिकाची लागवड केली होती. परंतु शेतामधून बाहेर माल काढण्यासाठी रस्ता नसल्याने व पपईला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने संपुर्ण पिकावर रोटा मारून पपई पिक उधवस्त केले. आता तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी शालिग्राम पाटील यांनी केली आहे.