बँक मॅनेजर, कर्मचार्‍यांच्या वादामुळे तब्बल साडेपाच तास बँक बंद

बोराडी स्टेट बँक शाखेतील प्रकार, राहुल रंधे यांनी केली मध्यस्थी
बँक मॅनेजर, कर्मचार्‍यांच्या वादामुळे तब्बल साडेपाच तास बँक बंद

बोराडी - Boradi - वार्ताहर :

येथील स्टेट बँक शाखेत बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या वादामुळे आज बँकेचे दिवसभर सर्व कामकाज बंद राहिल्यामुळे

ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वादामुळे तब्बल साडेपाच तासानंतर बँकेचे काम सुरू झाले.

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास बँक मॅनेजर व कर्मचार्‍यांमध्ये कामावरून वाद झाला. यात बँक मॅनेजर यांनी कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्याचे उपस्थित ग्राहकांनी सांगितले.

यावरून बँक कर्मचार्‍यांनी काम बंद करून एका ठिकाणी जाऊन बसले जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत काम करणार नाही असा ठाम निर्णय बँक कर्मचार्‍यांनी घेतला.

आज सोमवार असल्याने परिसरातील खातेदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. पैसे काढायचे होते. पण आज बँकेच्या गोंधळामुळे सर्वांचे काम रखडले. यामुळे सर्व ग्राहक त्रस्त होऊन बँके बाहेर उभे होते.

याबाबत बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे, सामाजिक कार्यकर्ते रमन पावरा यांना माहिती मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली व बँकेतील परिस्थितीबाबत बँक मॅनेजर यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळीत्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली.

त्याच दरम्यान राहुल रंधे यांनी जिल्हाधिकारी व प्रांतधिकारी यांच्याशी दुरध्वनी करून संपर्क साधून बँकेतील परिस्थितीची माहिती दिली व बँकेतील मॅनेजर यांचा मनमानी कारभारा विरोधात दखल घेण्याची विनंती केली.

अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या अनागोंधी व मनमानी कारभारामुळे गरीब, आदिवासी, वयोवृद्ध यांना दिवसभर त्रास झाला. त्याबद्दल अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना राहुल रंधे यांनी खडेबोल सुनावले.

नागरिकांनीही आपल्या समस्या तक्रार पुस्तकात लिहून मदतीची मागणी केली व तसेच गरजा घेऊन येणार्‍या नागरिकांना दिवसभर बँकसमोर भरउन्हात उभे राहून बँकेत गेले असता एका मिनिटात ते काम भोंगळ कारभारामुळे विलंब झाला.

बँकेचे आज सकाळ पासून काम बंद होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन उपशाखाधिकारी रुजू झाल्यानंतर बँकेचे काम सुरू झाले. बँक मॅनेजर व कर्मचार्‍यांच्या वादामुळे तब्बल साडेपाच तासानंतर बँकेचे काम सुरू झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com