धुळ्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; तिघे ताब्यात
धुळेशहर

धुळ्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; तिघे ताब्यात

एलसीबीने केली कारवाई

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात रेमडिसेवरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना एलसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून रेमडीसेवरसह सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान रेमडीसेवर हे इंजे्नशन देवपुरात 16 हजार रुपयात विकले जाणार होते. व्यवहार होण्यापूर्वी एलसीबीने सापळा कारवाई केली.

कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. अशावेळी रुग्णांना दिलासा देवून मदतीचा हात पुढे करण्याऐवजी काही जण रेमडीसेवर या इंजे्नशनची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी अशा अमानविय कृत्य करणार्‍यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार एलसीबीची पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी l पथके तयार केले होते.

काल दि.12 रोजी बनावट ग्राहक तयार करून देवपुरातील दत्तमंदिर चौकात सापळा रचून रेमडीसेव्हरचे इंजे्नशन 16 हजारात विकणार्‍या कृष्णा भिकन पाटील (वय 22 रा.फॉरेस्ट कॉलनी नगावबारी देवपुर,धुळे) याला पथकाने पकडले. त्याच्याकडून एक रेमडीसेवर इंजेक्शन , रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 38 हजार 899 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितले.

त्यावरुन सागर विलास भदाणे (वय 26 रा.फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी देवपुर) आणि चिलेश कैलास भामरे (वय 22 रा.यशवंत नगरसाक्रीरोड) या दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघाविरुध्द भादंवि कलम 420, 276 सह औषध नियंत्रण किंमत आदेश 2013 चे परिशिष्ट (वय 26),अत्यावश्यक वस्तु कायदा 1995 चे कलम,3 (2)(सी) व शिक्षा कलम 7,औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940, नियम 1945 चे कलम 18 (सी) शिक्षा कलम 27 (बी)(2) प्रमाणे देवपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एलसीबी निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न औषध प्रशासनातील सहाय्यक आयु्नत संतोष कृष्णा कांबळे, महेश विनायकराव देशपांडे यांच्या उपस्थितीत एपीआय बोरसे, पीएसआय सुशांत वळवी, हे.कॉ.संदीप थोरात, पोना प्रकाश सोनार, पो.कॉ.योगेश जगताप, जाधव, संजय सुरसे, कैलास महाजन, मनोज पाटील व सामाजिक कार्यकर्ते सचिन शेवतकर यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com