तळोद्याचे राजेंद्रकुमार गावीत दाम्पत्यावर असंपदेचा गुन्हा

42 लाखांची अपसंपदा, दोघेही फरार
तळोद्याचे राजेंद्रकुमार गावीत दाम्पत्यावर असंपदेचा गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मंत्रालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या मुळ नंदुरबार जिल्ह्यातील राजेंद्र गावीत यांनी भ्रष्ट मार्गाने तब्बल 42 लाखांची अपसंपदा जमविल्याचे उघड झाले आहे.

यासाठी त्यांना स्वेच्छानिवृत्ती पोलिस निरीक्षक पत्नीने देखील सहाय्य केल्याने या गावीत दात्पत्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघे फरार असून एसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे.

याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत (वय 59 रा. प्लॉट नं. 5, प्रतापनगर, तळोदा जि.नंदुरबार) याने मंत्रालयात वर्ग 2 पदावर कक्ष अधिकारी म्हणून काम करतांना 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2013 या काळात 2 कोटी 43 लाख 81 हजार 461 रुपयांचे उत्पन्न संपादीत केले. या कालावधीत त्याने 1 कोटी 6 लाख 95 हजार 582 रुपये खर्च देखील केले.

लोकसेवक असलेल्या राजेंद्रकुमार गावीतने एकूण 1 कोटी 79 लाख 35 हजार 219 रुपयांची मालमत्ता संपादीत केली.

त्याच्याकडे असलेली मालमत्ता त्याच्या ज्ञात उत्पन्नाशी विसंगत आहे. राजेंद्रकुमार यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 42 लाख 49 हजार 340 रुपये म्हणजेच 17.42 टक्के अपसंपदा धारण केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच त्याची पत्नी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सौ.ईला राजेंद्रकुमार गावीत यांनी ही अपसंपदा स्वतःच्या नावे धारण करून राजेंद्रकुमार गावीत यांना अपसंपदा धारण करण्यास सहाय्य केले.

त्यानुसार या गावीत दाम्प्त्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1998, संशोधन , 2018 चे कलम 13 (1)(अ) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com