खड्ड्यात मुरुम टाकून शिवसेनेचे प्रतिकात्मक आंदोलन

मनपा सत्ताधार्‍यांसह अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा आरोप
खड्ड्यात मुरुम टाकून शिवसेनेचे प्रतिकात्मक आंदोलन

धुळे Dhule| प्रतिनिधी

शहरातील देवपूर Devpur असो वा मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण Literally sifting the roads झाली असून मनपा Dhule Municipal Corporation पदाधिकारी व अधिकारी भ्रष्टाचारात रुतल्याचा आरोप करीत शिवसेनेने Shiv Sena आज मुरुमने काही खड्डे बुजवून प्रतिकात्मक आंदोलन Symbolic movement केले. यावेळी मनपा सत्ताधार्‍यांच्या विरोधात घोषणाही दिल्यात.

आंदोलन प्रसंगी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, संघटक राजेश पटवारी, उपमहानगरप्रमुख संदीप चव्हाण, पुरुषोत्तम जाधव, पंकज भारस्कर, ललित माळी, प्रवीण जोंधळे, सचिन बडगुजर, नंदलाल फुलपगारे, संजय वाल्हे, बाळासाहेब आगलावे, संजय जवराज, संजय जगताप, शोएब मिर्झा, कुणाल कानकाटे, भटू गवळी, केशव माळी, रविंद्र माळी, महेंद्र निकम आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मनपा सत्ताधार्‍यांना शहरातील रस्त्यांचे खड्डे दिसत नसतील का? मोठ मोठे खड्डे असतांना ते बुजवण्याचे धाडस का करत नाही? त्यांना खड्डे बुजवता येतील पण भ्रष्टाचाराचा मलिदा खाण्यासाठी नवीन रस्ते टाकून पुन्हा पैसा लाटण्याची त्यांची सवय असल्याचा आरोपही सेना पदाधिकार्‍यांनी केला.

शिवसेनेने अनेक वेळा खड्ड्यानसाठी आंदोलने केले आहेत. शहरातील खड्ड्यान मूळे नागरिकांचे हाल होत आहे. मात्र महासभा असो स्थायी समिती बैठक, फोटो काढण्यापूरतेच नाटक करून नंतर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ अशा पध्दतीने वागत असल्याची टिकाही आंदोलकांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com