गाय चोरीचा संशय, तिघांवर गुन्हा

गाय चोरीचा संशय, तिघांवर गुन्हा

धुळे । Dhule। प्रतिनिधी

तालुक्यातील सरवड फाटा परिसरात काल रात्री गाय (cow) घेवून फिरणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान तिघांनी गायीच्या मालकी हक्काबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण न देता उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गाय (cow) चोरीची किंवा लबाडीने आणलेली असून शकते. म्हणून पोलिसांनी त्यांच्याकडून 15 हजार रूपये किंमतीची गाय ताब्यात घेतली.

याप्रकरणी पोकाँ विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी भगवान गैंदल चौधरी (वय 30 रा. टेकवाडे ता. शिरपूर), सावकार धुडकु कोळी (वय 20) व अशोक यशवंत कोळी (वय 39 रा. तराडकसबे ता. शिरपूर) या तिघांविरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना सानप करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com