आत्महत्या
आत्महत्या
धुळे

धुळे : पानखेडा येथे तरुणीची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule :

साक्री तालुक्यातील पानखेडा येथे 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने मुंग्या मारण्याचा खडू खाऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने तिला घरी घेवून जाण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत प्रियकराविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पानखेडा येथे राहणारा धनलाल रवींद्र मोरे याच्याशी त्या तरुणीचे प्रेमसंबंध होते. तो तिच्या घरी नेहमी जात होता. मुलीच्या आईने धनलाल याला रुमचे भाडे भरण्यासाठी 20 हजार रुपये घेवून ये आणि तुझ्या आई-वडिलांना सोबत घेवून ये व या तरुणीला तुझ्या घरी घेवून जा असे सांगितले.

मात्र धनलाल याने आई-वडिलांना आणले नाही, तसेच तो मुलीच्या घरी देखील आला नाही. या मनस्तापातून त्या तरुणीने मुंग्या मारण्याचा खडू खाऊ आत्महत्या केली. यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल धनलाल रवींद्र मोरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com