दोंडाईचात विवाहितेची आत्महत्या

दोंडाईचात विवाहितेची आत्महत्या

दोंडाईचा Dondaicha । श.प्र

शहरातील विद्या नगरात गणेश चतुर्थीच्या दिवशीच विवाहितेने ( married woman) गळफास घेत आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे. मंगला देवेंंद्र राजपूत (Mangala Devendra Rajput) (रा. विद्या नगर) असे तिचे नाव आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त आज कुटुंब एकत्र आले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा मंगला हिने घराच्या बेडरूममध्ये जात आतून दरवाजा लावून घेतला. दरवाजाचा जोरात आवात आल्याने कुटुंबिय धावून गेले. खिडकी उघडून पाहिले असता मंगला ही छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर दरवाजा तोडून मंगला हिस खाली उतरवून उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत सासरे भटेसिंग राजपुत यांच्या माहितीवरून दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com