सावकारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

दोघांवर गुन्हा
सावकारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सावकारच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बाळदे येथील प्रभाकर तुळशीराम पाटील (वय46) याने शेतात आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह 11 जुलै रोजी शेतात आढळून आला होता. याबाबत प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

याबाबत मयताची पत्नी गायत्री प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संजय राधेश्याम शर्मा व अभिजीत निळकंठ देसले दोघे रा. शिरपूर यांनी ज्यादा व्याजदर लावल्याने रकमेसाठी वारंवार धमक्या दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून पती प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या केली.

त्यांच्या फिर्यादीवरुन संजय शर्मा व अभिजीत देसले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com