दोन्ही मुलींसह मातेने घेतला गळफास
धुळे

दोन्ही मुलींसह मातेने घेतला गळफास

धक्कादायक घटनेने साक्री शहर हादरले

Rajendra Patil

धुळे । प्रतिनिधी Dhule

साक्री शहरातील आदर्श नगरात आज धक्कादायक घटना उघडकीस आली. महिलेने आपल्या दोघं चिमुकल्या मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली.

अनिता पंकज शिंदे (28) रिया (5) भाग्यश्री (3) असे दुर्दैवी मृतांची नावे आहेत. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पती पंकज शिंदे आणि मृत महिलेचे वडील मोहन जाधव हे जेवणासाठी घरी आले असता ही बाब उघडकीस आली.

हे दोघेही फर्निचर बनविण्याची कामे करतात. आठ दिवसांपूर्वीच मोहन जाधव हे त्यांच्याकडे राहण्यासाठी आले आहेत. नेहमीप्रमाणे दोघेही आज कामाला गेले होते. त्यांच्या पश्चात ही घटना घडली.

Deshdoot
www.deshdoot.com