स्टेशन मास्तरची गळफास घेवून आत्महत्या
धुळे

स्टेशन मास्तरची गळफास घेवून आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील रेल्वे स्टेशन मास्तरने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंद रमेश गुप्ता (वय29) रा. इंडोन, राजस्थान असे मृताचे नाव आहे. गेल्या एक वर्षापासून आनंद गुप्ता यांची स्टेशन मास्तर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते अविवाहित असून रेल्वे क्वॉटर्समध्ये ते राहत होते. त्यां

नी रात्री राहत्या घरी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराचा लाईट सुरु असल्यामुळे शेजारी राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना गुप्ता हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे एपीआय तिगोटे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी आनंद गुप्ता यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

त्यांना उपचारार्थ हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टारांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com