कुरखळीत 12 एकर ऊस जळून खाक

कुरखळीत 12 एकर ऊस जळून खाक

कुरखळी - Shirpur - वार्ताहर :

शिरपूर तालुक्यातील कुरखळी शिवारातील 12 एकर ऊस शॉटसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना दि. 29 जानेवारी रोजी दुपारी 1.30 ते 2 च्या सुमारास घडली.

तालुक्यातील कुरखळी शिवारात अनिल तुळशीराम मोरे, गणपत शंकर मोरे, सुभाष शंकर मोरे, थॉमस अंबालाल राजपूत यांच्या मालकीची एकूण 12 एकर शेती आहे.

त्या शेतात 9805, 265 या वाणाच्या उसाची लागवड करण्यात आलेली होती. दि. 29 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावर असलेल्या डी. पी. वरून गेलेले रोहित्र एकमेकांना जुळल्यामुळे ठिंणगी शेतात पडून शॉटसर्किट होऊन अचानक आग लागली. हवेमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

शेतात आग लागल्याचे समजताच कुरखळी गावातून 15 ते 20 युवक व शेतकर्‍यांनी आग विझविण्यासाठी शेताकडे धाव घेतली. कुरखळीतील शेतकर्‍याच्या समयसूचकतेमुळे व जवळच्या शेतात काम करणार्‍या मजुरांच्या तत्परतेमुळे आग विझविण्यास मोठी मदत झाली.

या आगीत अंदाजे 400 टन ऊस सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आग बाधित शेताच्या आजूबाजूला अंदाजे 20 एकर ऊस हा तोडणीला आलेला होता.

शेतकर्‍यांच्या ध्येर्यामुळे पुढच्या शेतात लागणार्‍या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्‍यांनी रोटा मारून, कुरखळी व सावळदे गावातील युवक व शेतकर्‍यांच्या मदतीने ऊस तोडुन आग विझविण्यास मदत झाली.

20 एकर ऊस आगीच्या स्वाधीन होण्यापासून वाचला याचे समाधानही शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरन दिसून आले.

या अग्निउपद्रवाच्या घटनेची सूचना तलाठी व वीज वितरण कंपनीच्या उंटावद कार्यालयाला दिली. त्यानंतर वायरमन श्री. रज्जाक शेख हे घटनास्थळी पोहचून घटनेचा आढावा घेत व स्थानिक शेतकर्‍यांच्या जबाबवरून सदर घटना रोहित्रांच्या एकत्र स्पार्क झाल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी तलाठी हे देखील घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे निघून गेल्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. व दस्तावेजांच्या पूर्ततेसाठीची धावपळ करून देखील मदतीची आशा दिसत नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com