धुळ्यात गावठी कट्टा विक्रीचा व्यवहार उधळला

धुळ्यात गावठी कट्टा विक्रीचा व्यवहार उधळला

आझाद नगर पोलिसांची यशस्वी कामगीरी, वेशांतर करुन दोघं तरूणांना केली अटक, ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे | प्रतिनिधी Dhule

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Market Committee) गावठी कट्टा विक्रीचा होणारा व्यवहार आझादनगर पोलिसांनी (Azadnagar Police) वेशांतर करून उधळून लावला. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कट्यासह दोन जिवंत काडतुस असा एकुण ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल रात्री ही कारवाई करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिस्टल आणि जीवंत काडतुस विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक बाजार समितीत पोहचले. पोलिसांनी हमालाचा वेश धारण करत सापळा रचला. रात्री एम.एच.४१ एन.७४७१ क्रमांकाच्या दुचाकीवरुन दोन जण धान्य विक्रीच्या शेडजवळ जावून थांबले. हमालाच्या वेशातील पोलिस पथक त्यांच्या जवळ पोहचत असतानाच ते

पोलिस असल्याचा संशय दोघांना आला. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करुन दोघांना पकडले. मोहम्मद इरफान मोहम्मद कौसर अन्सारी (वय ४१ रा.वडजाई रोड,आझादनगर, धुळे) व साहील सत्तार शाह (वय २० रा.रामदेवबाबा नगर,धुळे) अशी दोघांची नावे आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, ५०० रुपये किंमतीचे जीवंत काडतुस, ५०० रुपये किंमतीचा मोबाईल मिळून आला. यासह ३० हजारांची दुचाकी असा एकुण ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघोविरुध्द हत्त्यार कायदा कलम,३/२५ प्रमाणे गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एम.जे.सैय्यद करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत,अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एसडीपीओ दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक भिकाजी पाटील, पोहेकॉ.सुनिल पाथरवट, दगडू कोळी, जयेश भागवत, आसिफ शेख, शोएब बेग, रमेश गुरव यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com