धुळ्यात विद्यार्थ्याने केला घरमालकाचा खून

भाड्याचा तगादा लावल्याने घडली घटना ; महिलेला देखील मारण्याचा प्रयत्न
धुळ्यात विद्यार्थ्याने केला घरमालकाचा खून
Crime

धुळे । (प्रतिनिधी) - Dhule

शहरातील चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत घर भाड्याचा तगादा लावण्याच्या कारणावरून भाडेकरू विद्यार्थ्याने घरमालकाचा लोखंडी पावडीने वार करत निघृण खून केला.

आज सकाळी ही खळबळजनक घटना घडली. दरम्यान घर मालकाचा खून केल्यानंतर भाडेकर विद्यार्थ्याने घर मालकाच्या पत्नीलाही जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तीने आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी केली होती.

रमेश हिलाल श्रीराव ( वय 60, प्लॉट नं.4, आशिर्वाद बंगला राजहंस कॉलनी, धुळे) असे मयत घर मालकाचे नाव आहे. ते स्टेट बँकेच्या कुसुंबा शाखेतून एप्रिलमध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या घरात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून जुन्नर येथील मुकबधीर शाळेत शिक्षक असलेले विश्वनाथ मेमाणे हे कुटूंबासह राहत होते. त्यांना दोन मुले असून अजिक्य मेमाणे (वय 22) हा कोपरगाव येथे बीसीएचे शिक्षण घेत होता.

लॉकडाऊनमुळे तो काही महिन्यांपासून आई-वडीलांकडे राहत होता. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रमेश श्रीराव हे टेरेसवर योगा करीत असताना अजिंक्यने त्यांच्यावर मागून लोखंडी पावडीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्याने श्रीराव यांची पत्नीचा गळा होण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कडून सुटका करत गॅलरी धाव घेत आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आजू-बाजूचे लोक धावून आले.

त्यांनी अजिंक्य ला पकडले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि तिगोटे, दादासाहेब पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. थकीत घरभाड्याचा तगादा लावल्याने अजिंक्य मेमाने याने रमेश श्रीराव यांचा खून केल्याची घटनास्थळी चर्चा होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com