धुळे

विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

Balvant Gaikwad

शहरातील सावित्रीबाई मुलींचे शासकीय आदिवासी निवासी वसतीगृहातील टॉयलेटमध्ये स्वत: प्रसुती करुन घेवून बाळाला फेकून दिल्या प्रकरणी त्या विद्यार्थीनीवर साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावित्रीबाई मुलींचे शासकीय आदिवासी निवासी वसतीगृहात कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असणारी विद्यार्थीनी राहते. तिने स्वत: टॉयलेटमध्ये प्रसुती करुन नंतर बाळाला बादलीमध्ये टाकून वसतीगृहाच्या जवळ बाळाला फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान वसतीगृहात विद्यार्थीनीची प्रसुती झाली.

परंतु वसतीगृहातील अधिकार्‍यांना याबाबत काहीच माहित नाही. वसतीगृहातील त्या युवतीने दोन महिन्यापुर्वीच साक्री शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्या तपासणीत डॉक्टरांनी तिचा रिपोर्ट निल दाखविला होता. त्यानंतर दोन महिन्यातच त्या विद्यार्थीनीने एका बालकाला जन्म दिला. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

वसतीगृहात याबाबत कमालीची गुप्तता वसतीगृह प्रशासनाकडून पाळली जात आहे. बाळ व बाळंतीन या दोघांना धुळे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर विद्यार्थीनीही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बाळाला जन्म देवून त्याला फेकून दिल्या प्रकरणी त्या विद्यार्थीनीवर साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com