खानदेशात आरोग्य सुविधा बळकट करणार-डॉ. भारती पवार

जन आशीर्वाद यात्रेचे दोंडाईचा येथे भव्य स्वागत, अम्बुलन्सचे लोर्कापण
खानदेशात आरोग्य सुविधा बळकट करणार-डॉ. भारती पवार

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

कोरोना काळात फ्रंट लाईन वर्करसह सर्वांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली देश व आम्ही सुरक्षित आहोत. तिसरी लाट रोखण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे, सोयीसाठी 23 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे. दरम्यान धुळे, नंदुरबार, खान्देशला आरोग्य सेवा बळकट health facilities in Khandesh करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar यांनी दोंडाईचात केले. दोंडाईचा येथे आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत Janaashirwad Yatra ते बोलत होते.

आ. जयकुमार रावल यांचा स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक उपकरणे व सर्व सेवासुविधानी सुसज्ज असलेली कार्डियाक अंबुलन्सचे लोकार्पण ना. डॉ. भारती पवार व आ. जयकुमार रावल, आ. गिरीश महाजन, नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांचा हस्ते करण्यात आले.

नगरपालिकेचा प्रांगणात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अशोक उळके, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, आ. काशीराम पावरा, भाजप राज्य उपाध्यक्ष बबन चौधरी, आ. राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, भाजपा जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, कुसुम निकम, वैशाली सोनवणे, नंदुरबार भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती कल्पना नगराळे, जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती निखिल जाधव, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, सभापती वैशाली महाजन, प्रदीप कागणे, कृष्णा नगराळे, राजू धनगर आदी होते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसर्‍या हप्त्याच्या निधीचा धनादेश काही लाभार्थीना देण्यात आला.

नंदुरबार चौफुली ते नगरपालिकापावेतो मोटरसायकलरॅली व जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या की, दोंडाईचा नगरपालिकेने कोरोना काळात व इतरवेळी वाखाणण्याजोगे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले काम करण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती भारताने केली असून आतापावेतो 56 कोटी जनतेला लस दिली गेली आहे. कोरोना तिसरी लाट रोखण्यासाठी 23 हजार कोटीचे आरोग्य पॅकेज दिले आहे.

आ. रावल म्हणाले की, या अंबूलन्सचा फायदा रुग्णांना होणार आहे. दोंडाईचा नगरपालिकेने कोरोना काळात चांगले काम केले आहे. पर्यटन खात्याचा माध्यमातून आपण मंजूर केलेला निधी आताचे राज्य शासन अन्यत्र नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आ. महाजन म्हणाले, दोेंडाईचा नगरपालिके सारखी अत्याधुनिक इमारत कुठेही नाही. आरोग्य खाते महत्वाचे असून मंत्री पवार यांनी खान्देशला झुकते माप देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com