धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील बिलाडी शिवारातून चोरट्यांनी तब्बल 50 मेंढ्या चोरून नेल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मेंढपाळ गोरख सिताराम बाचकर (वय 39 रा. गोकुळ नगर, वाघापूर ता. साक्री) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार बिलाडी शिवारात मेंढपाळ कुटुंब झोपलेले असतांना दि. 15 रोजी रात्री चोरट्यांनी सुमारे 50 मेंढ्या चोरून नेल्या.

त्यांची किंमत पाच लाख रूपये आहे. सकाळी जाग आल्यानंतर मेंढ्या दिसून न आल्याने मेंढपाळ कुटूंंबाने तालुका पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय ए.एन. देवरे करीत आहेत.