धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील निजामपूरातील शिवाजी नगरातील साईकृपा कन्ट्रक्शन येथून चोरट्यांनी स्टीलच्या तारेच बंडल व अँंगल असा एकुण

4 लाखांचा मुद्येमाल लंपास केला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसात चोरट्यांवर अज्ञात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत साई कन्ट्रक्शनचे सुपरायझर शांतीलाल जीवाजी प्रजापत (वय 47 रा. शिवाजी नगर ता. साक्री ह.मु सिंहगड रोड, धायरी, पुणे) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार दि. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी साईकृपा कन्ट्रक्शन येथून 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचे स्टीलच्या तारेचे 49 बंडल, तारेची जाळी आणि 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे सुमारे 3 टन लोखंडी अँगल, असा एकूण 4 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल चोरुन नेला.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पीएसआय एम.एच.जेजोट करीत आहेत.