सोनगीर - Songir - वार्ताहर :

करोनाचे संकट लक्षात घेता वधुपित्याने विवाहास येणार्या नातेवाईकांसोबतच पंचक्रोशीतील नागरीकांना मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

यात 101 वर्हाडींनी रक्तदान केले. तसेच वधुचे काका शरद पंडितराव पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा यांनी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिंदखेडा तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याकडे सुपूर्द केला.

शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील तुषार आत्माराम पाटील यांची सुकन्या स्वाती हिचा विवाह शिरपूर येथील दशरथ काशीराम पाटील यांचा पुत्र दर्शन यांच्याशी आज 19 डिसेंबरला दुपारी मोठ्या दिमाखात पार पडला.

या विवाह सोहळातून वधू व वर पित्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विवाहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आपल्या सग्या सोयर्यांना सोबतच परिसरातील युवकांनी रक्तदान केले.

येणार्या प्रत्येकास मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्यासोबतच सोशल डिस्टन्स अटींचे पालन व्हावे यासाठी काळजी घेतली गेली. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनांना विवाहसमारंभातून प्रतिसाद देण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे परिवाराचे म्हणणे आहे.

या विवाह सोहळ्यास आलेल्या वर्हाडी व युवकांसह दात्यांनी 101 रक्तदान केले. यासाठी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी माजी मंत्री रोहीदास पाटील, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, तहसीलदार सुनिल सैंदाणे, पोलीस निरीक्षक ऐ.एम प्रधान, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, हेमराज पाटील शानाभाऊ सोनवणे, सेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, प्रा.अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, माजी सदस्य अविनाश महाजन, राजेंद्र महाजन, बाभळेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, राम भदाणे, डॉ.अजय सोनवणे, विजेंद्र झालसे, किशोर पाटील, महेश ईशी, श्रीराम ईशी, निळकंठ रघुवंशी आदी उपस्थित होते.या रक्तदान शिबिरासाठी धुळ्याच्या अर्पण रक्तपेढीचे सहकार्य मिळाले.