सोनगीर - Songir - वार्ताहर :

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाघाडी फाट्यावरील गतिरोधकवर भरधाव ट्रॅक्टरची ट्राली दुचाकीवर उलटल्याने एक ठार व एक जण जखमी झाला.

हा अपघात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. रविंद्र संतोष पाटील (वय 45 रा. सायने ता. धुळे) असे मयताचे नाव आहे.

शिरपूरकडून धुळ्याकडे मक्याचा बारीक चारा भरून जाणार्या ट्रॅक्टरला दोन ट्राली जोडलेल्या होत्या. वाघाडी फाट्यावर गतिरोधकावर वेगात असलेल्या ट्रॅक्टरची मागची ट्राली उलटली.

त्याचवेळी मागून येणार्या दुचाकीस्वाराने (क्र.एमएच 18, एएम 6493) गतिरोधक वाचविण्यासाठी महामार्ग उतरून पुढे नेत असताना ट्राली दुचाकीवर उलटली.

त्यात रविंद्र पाटील हे जागीच ठार झाले. तर प्रवीण संतोष कोळी (वय 36 राहणार सायने) हा जबर जखमी झाला.

दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही बांधकाम कामगार असून ते बाभळे औद्योगिक वसाहत येथून काम संपवून घरी जात होते. ट्रॅक्टर (कुकाणे ता. साक्री) येथे जात होते.