शासनाचा लोगो असलेल्या कारमधून गांजाची तस्करी

मुंबईतील दोघे ताब्यात, मोहाडी पोलिसांची कामगिरी
शासनाचा लोगो असलेल्या कारमधून गांजाची तस्करी

धुळे - प्रतिनिधी Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान शिवारात मोहाडी पोलिसांनी पाठलाग करत गांजाची वाहतूक करणार्‍या कारला पकडले. मुंबईतील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४० हजारांचा गांजासह साडेतीन लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे कारच्या पुढच्या काचेवर महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरून गांजाची तस्करी केली जात होती. काल दि.३ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई केली.

पोलिसांनी अवधान शिवारातील सद्गुरू प्लायवुड ऍन्ड डोअर हाऊस समोर पाठलाग करून शिरपूरहून मुंबईकडे जाणार्‍या कारला (क्र. एमएच ०५ बीजे ३१९०) पकडले. कारची तपासणी केली असता डिक्कीत एका पिवळ्या रंगाच्या थैलीत एकुण चार प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये एकुण १० किलो १६१ ग्रॅम सुका गांजा मिळून आला. पोलिसांनी कारचालक इरफान युसुफ अन्सारी (वय ३७) व मोहंमद रेहान मो.हानिफ कुरेशी (वय १९ रा. अंधेरी मार्केट, अबु बखर पत्रेवाली चाळ, एस.व्ही. रोड राममंदिराजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख रूपये किंमतीची कार, ४० हजार ६४४ रूपयांचा गांजा व दोन मोबाईल असा एकुण ३ लाख ४६ हजार ६४४ रूपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

पोहेकॉ प्रभाकर ब्राम्हणे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मिर्झा करीत आहेत. ही कामगिरी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरू, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, पोहेकॉं राजेंद्र मराठे, प्रभाकर बाम्हणे, शाम निकम, शाम काळे, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, अजय दाभाडे, धिरज गवते, कांतीलाल शिरसाठ यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com