धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेने अद्यावत आधुनिक रोबटद्वारे स्वच्छता केल्याची दखल घेवून महापालिकेला रजत पदक मिळाले आहे.

नवनवीन अद्यावत आधुनिक तंत्राद्वारे स्वच्छता करणे व त्यासाठी कारवाई करणे याची दखल घेवून स्कॉच संस्थेतर्फे महापालिका, नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यासाठी स्पर्धा घेतली होती.

या स्कॉच अवार्डसाठी धुळे महापालिकेने सहभाग नोंदविला. महापालिकेने भुमिगत गटार साफ करण्यासाठी रोबटचा वापर केला. कर्मचार्यांना गटारीमध्ये न उतरता रोबटद्वारे स्वच्छता करणे शक्य होत आहे. यामुळे कर्मचार्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत नाही.

आज दि. 22 डिसेंबर रोजी 69 स्कॉच समिटचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा अवॉर्ड मिळण्यासाठी नागरिकांच्या माध्यमातून 20 टक्के अभिप्राय व 80 टक्के परिक्षकांचे अभिप्राय असे गुणांचे विभाजन करण्यात आले होते.

सदर अवॉर्डसाठी संपुर्ण देशातून एक हजार पेक्षा जास्त महापालिकांनी आणि नगरपरिषदांनी सहभागी घेतला होता. त्यात रोबटच्या माध्यमातून केलेल्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेवून धुळे महापालिकेला रजद पदक मिळाले आहे.

याबद्दल आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपआयुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, प्रकल्प अधिकारी शरयु सनेर, श्रीनाथ देशपांडे, जुनैद अन्सारी, चंद्रकांत जाधव यांनी सहकार्य केले.