सिध्दी न्यूरोकेअर व होमिओपॅथिक सेंटरचे नवीन जागेत स्थलांतर

सिध्दी न्यूरोकेअर व होमिओपॅथिक सेंटरचे नवीन जागेत स्थलांतर

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी

खान्देशातील प्रसिध्द मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉ.सुशिल महाजन व होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. निशा महाजन यांच्या सिध्दी न्यूरोकेअर व होमिओपॅथिक सेंटरचे नवीन जागेत स्थलांतर झाले.

अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह असलेल्या या 30 बेडच्या हॉस्पीटलमध्ये रुग्णांना विविध उपचार मिळणार असल्याची माहिती डॉ.सुशिल महाजन व डॉ. निशा महाजन यांनी दिली आहे.

सिध्दी न्यूरोकेअर व होमिओपॅथिक सेंटरच्या माध्यमातून महाजन दाम्पत्य गेली अनेक वर्ष रुग्णांना सेवा देत आहेत. रुग्णांना अजुन विविध आवश्यक सुविधा देता याव्यात म्हणून सिध्दी हॉस्पिटलचे स्थलांतर आता शारदा नगर पेट्रोल पंपासमोर, दत्त मंदिर चौक येथे करण्यात आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर, या भव्य हॉस्पिटलचा कौटुंबिक वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

नविन 30 बेडचे हॉस्पिटल, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सेवेत दाखल झाले आहे. या सिध्दी न्यूरोकेअर व होमिओपॅथिक सेंटरमध्ये विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत. यात बि.ई.ए.आर, ई.एम.जी./ एन.सी.व्ही., व्हि.ई.पी., बोटॉक्स इंजेक्शन पध्दतीची सुविधा, स्लीप स्टडी, ई.ई.जी., व्हिडिओ ईईजी, 30 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, न्यूरो आय.सी.यू., सुपर स्पेशलाईज्ड होमिओपॅथी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर आदी सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.

या हॉस्पिटलमध्ये मिर्गी, स्नायुंची कमजोरी व अशक्तपणा, डोकेदुखी, उतारवयात हातापायांची थरथर होणे, लकवा, लहान मुलांचे मेंदूचे आजार, मेंदुज्वर, हातापायांना मुंग्या येणे आणि अर्धशिशी, चक्कर येणे, स्मृतीदोष, चेतापेशींची कमजोरी व मणक्यांचे आजार आदी विविध आजारांचे निदान होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com