तहसीलदारांनी पकडले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर

तहसीलदारांनी पकडले पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावातील अरुणावती नदी पात्रातुन अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई केली.

गुरुवारी पहाटे पथकासोबत तहसीलदार सायकलीवर अरुणावती नदी पात्रात गेले. त्यावेळी अनाधिकृत वाळू चोरी करतांना आढळून आले म्हणून नदी पात्रातून एक ट्रॅक्टर पकडले.

वाहन मालकाचे नाव विकास माळी असून ट्रॅक्टर क्र. एम.एच. 18 झेड 4022 या नंबरचे स्वराज कंपनीचे ट्रॅकर तहसीलदार व त्यांच्या पथकाने भरलेल्या रेतीसह ट्रॅक्टर पकडल सदर ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आले.

याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार गणेश अढारी, मंडळ अधिकारी प्रशांत ढोले, तलाठी अमृत राजपूत, वाहन चालक सतीश पाटोळे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com