निराधार आजीला तहसीलदारांनी दिला आधार

निराधार आजीला तहसीलदारांनी दिला आधार

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तहसीलदार आबा महाजन यांनी वृध्द आजीची चौकशी करुन त्या आजीला रेशनकार्ड बनवून देवून एका महिन्याचा किराणा तहसीलदारांनी भरुन दिला व यातून माणुसकीचे दर्शन दिसून आले.

तहसीलदार आबा महाजन हे नेहमीच तालुक्यातील भागांमध्ये भ्रमण करत असतात. तहसीलदार आबा महाजन हे कोविड परिस्थितीचा आढावा घेत शहरात फिरत असतांना शिरपूर शहरातील नदीकिनारी असलेल्या खंडेराव मंदिर जवळ गाडी थांबून सहज पडक्या घरात डोकावून पाहिलं. तेव्हा एक वृद्ध आजी राहात असल्याचे त्यांना दिसले.

याबाबत त्यांनी चौकशी केली असता दोन लोकांच्या कुटुंबात आजीचे पती प्रभाकर भावसार हे आठ दिवसापूर्वी मयत झाल्याचे त्या आजीने त्यांना सांगितले. आजी कडे पाहून तहसीलदारांनी त्यांना उदरनिर्वाहाच आता पुढे काय अशी विचारणा केली. घरात धान्य नसल्याचे आजीने सांगितले.

तेव्हा प्रधानमंत्री गरीब कुटूंब योजनेत रेशन दुकानावर धान्य मोफत मिळत असल्याचे आजींना सांगितले. परंतु आजीकडे रेशनकार्ड नसल्याने ती हतबल असल्याचे लक्षात येताच तहसिलदारांनी ऑफिस गाठलं आणि आजीचे रेशनकार्ड तयार करून व महिनाभर पुरेल इतका किराणा घेऊन ते स्वतः व पुरवठा निरीक्षण अधिकारी मायनंद भामरे यांच्या समवेत आजीच्या घरी पोहोचले आणि आजीला एक महिना पुरेल इतका किराणा व रेशनकार्ड दिले. त्यावेळी आजीच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर, विकास सेन हेही उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com