शासकीय स्तरावरुन ऑक्सिजन प्लांट उभारा

आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांची मागणी
शासकीय स्तरावरुन ऑक्सिजन प्लांट उभारा
निवेदन देतांना आ.काशिराम पावरा,भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी,शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

सध्या शिरपूर तालुक्यात करोना महामारीने उग्ररुप धारण केले असल्यामुळे खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे दुरापास्त झाले आहे.

इतर अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव जात आहे. तसेच गंभीर रुग्णांना व्हेंटीलेटर अभावी प्राणास मुकावे लागत आहे.

म्हणून शिरपूर तालुक्यात शासकीय स्तरावरुन ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे अशी मागणी शिरपूर भाजपातर्फे आ.काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी तहसिलदार आबा महाजन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदन देतांना शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी उपस्थित होते.

निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, विधान सभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल यांनी देखील आपल्या परिवाराकडून 40 लाख रुपये देणगीतून मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्रकल्प सुरु केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com